भारतामध्ये महिलांच्या उद्योजकतेबाबत चर्चा झाली की काही राज्ये सातत्याने पुढे दिसून येतात. त्यात अग्रस्थानी आहे तमिळनाडू. सामाजिक दृष्ट्या पोषक वातावरण, सक्षम धोरणात्मक पाठबळ आणि संस्थात्मक मदत यांचा संगम कसा परिवर्तन घडवू शकतो, याचे प्रभावी उदाहरण म्हणजे तमिळनाडूची प्रगती. आकडेवारी सांगते यशाची कहाणी केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या Women and Men in India 2021 या अहवालात तमिळनाडूबाबत आनंददायी चित्र समोर आले आहे. सुमारे 80.5 लाख महिला-स्वामित्वाच्या उद्योगांपैकी तब्बल 10.87 लाख उद्योग तमिळनाडूत आहेत. म्हणजेच देशातील एकूण उद्योगांपैकी सुमारे 13.5% हिस्सा या राज्याचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर केरळ (9.14 लाख), त्यानंतर आंध्र प्रदेश (8.5 लाख) आणि पश्चिम बंगाल (8.3 लाख) आहेत. औद्योगिकदृष्ट्या प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांपेक्षा तमिळनाडू स्पष्टपणे पुढे आहे. ही सर्व आकडेवारी National Statistical Office (NSO) ने उद्धृत केलेल्या सहाव्या आर्थिक जनगणनेवर (2013-14) आधारित आहे. जरी ही माहिती क...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स